दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अककलकुवा व धडगांव तालुक्यात नदि नाल्यांना पुर येऊन व डोंगरावरून पाण्यासह माती वाहुन येऊन शेतकर्याचे पिकांचे, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे ,पशुहानी होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने याचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
अककलकुवा व धडगांव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदि नाल्यांना पुर येऊन नागरीकांचे घरांची पडझड होवुन जीवनावश्यक वस्तूंचे तसेच पशुपालकांचे पशु वाहुन गेल्याने व डोंगरावरून मातीच्या मलबासह वाहुन आलेल्या ,नदिच्या पाण्यामुळे शेतकर्याचे शेतातील पिकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय मदतसह नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे
