
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
गडगा प्रकल्पाच्या विहिरीचे पण पाणी दुषीतच
अमरावती :- मेळघाटात परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी येथे दूषित पाणी बाधा प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असल्यामुळे धारणीतील तातरा गावात सुद्धा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली असता प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली.
धारणी तालुक्यातील तातरा गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली तर येथील गडगा प्रकल्पाच्या विहिरीचे पाणी सुद्धा दूषित असल्याचे दिसून आले.अगोदरच पाचडोंगरी व कोयलारी येथे दूषित पाण्यामुळे अनेक मृत्यमुखी पडले असता तातरा गावातील पाणी पुरवठा दूषित असल्याची माहिती वृत्तपत्रांमद्धे प्रसिध्द होताच प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली.
माहितीप्राप्तीनुसार,धारणी तालुक्यातील तातरा गावात व गडगा प्रकल्पाच्या विहिरीचे पाणी दूषित असल्याची माहिती वृत्तपत्रांमद्धे प्रसिद्ध होताच संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि पाणी पुरवठा विभागाकडून जिल्हा परिषद निर्मिती द्वारा बोअरवेलच्या पाण्याचे शुद्धीकरण करून तातरा गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला.मात्र;गडगा प्रकल्पाने तयार केलेल्या विहिरीत सांडपाणी साचल्याने बंद करण्याचे निर्णय ग्राम विस्तारावर घेण्यात आले.
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उप-अभियंता श्री.दीपक कोराटे,कनिष्ठ अभियंता श्री.खैरनार,ग्रामसेवक श्री.नारले,आरोग्य सेवक श्री.सुरेश तानेकर यांनी पाहणी करून तातरा गावाला शुद्ध पाणी पुरवठा करून दिला.