दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी -विजय उंडे
खडकवाडी ता. पारनेर:- येथील श्री साईबाबा मंदिरात दरवर्षी वेदशास्त्रीआण्णा काका पोळ व भागवताचार्य ह भ प श्री बाबा महाराज खामकर यांचे प्रेरणेने गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित केला जातो. बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी खडकवाडी येथील साई मंदिरात गुरु पौर्णिमा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख मा. विकास रोहोकले, जिल्हा परिषद सदस्य सौ. राणीताई लंके, ग्राम उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रदीप दाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पहाटे ५ वाजता श्री साईंचे स्नान व काकड आरती होते. सकाळी. ७ ते ८ वाजता श्रींचा अभिषेक होतो. सकाळी८ ते १० वा. भागवताचार्य ह भ प बाबा महाराज खामकर यांचे हरिकीर्तन आयोजित केले होते. कीर्तनानंतर चारधाम यात्रा करून आलेल्या देसवडे तालुका पारनेर येथील व पंचक्रोशीतील भाविकांचा सन्मान करण्यात आला. सकाळी. १० ते १२ वा. स्वर बहार राजेंद्र टाक यांची साई भजन संध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर साईबाबांची आरती संपन्न झाली. आरतीचे मानकरी सौ. कविता व श्री विकास विठ्ठल रोकडे, सौ. विजया व श्री. संतोष शांतीलाल भंडारी, सौ. अलका व श्री. रामदास भाऊ टेकुडे, सौ. शारदा व श्री. भाऊसाहेब रेवजी दरेकर, सौ. शारदा व श्री. दगडू लक्ष्मण भोर, सौ. लहानबाई व श्री. एकनाथ रंगनाथ टेकुडे, सौ. इंदुबाई व श्री. दिलीपराव जानकु आगे सर, सौ. सुनीता व श्री. धोंडीभाऊ कारभारी शिंगोटे, सौ. अलका व श्री. संजय शेठ त्रिंबकराव उदावंत, सौ. मिनाबाई व श्री. शशिकांत भगवान दहिवाळ, सौ. भामाबाई व श्री. भाऊसाहेब मंजोबा टेकडे असे होते त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आलेल्या सर्व साई भाविकांना करण्यात आले होते. महाप्रसादाचे अन्नदाते कृषीभूषण श्री विकास विठ्ठलराव रोकडे ग्रामपंचायत सदस्य खडकवाडी यांनी आयोजित केले होते. मंदिर व मूर्तीची आकर्षक फुलसजावट नारायणगावचे अतुल शेटे यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन श्री साईबाबा ट्रस्ट खडकवाडी व समस्त ग्रामस्थ खडकवाडी यांनी फार सुंदर केले होते.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवस्थान ट्रस्ट कमिटीचे मार्गदर्शक प्रकाश शेठ शेवंते, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शेवंते, उपाध्यक्ष अमोल रोकडे, सचिव सुदाम आहेर, खजिनदार गणेश शेवंते, विश्वस्त सुभाष ढोकळे, विकास रोकडे, बाळासाहेब शिंगोटे, डॉ. बाबासाहेब ढोकळे, डॉ. विनायक दातीर, ॶॅड. शुभम खामकर, डॉ. अशोक दळवी, बाबासाहेब शिंदे, अनिल गागरे, कैलास आग्रे, सौ.मंदा गिरी, पुजारी रामनाथ कुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व साई भजन स्वर बहार राजेंद्र टाक यांनी केले.
