
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
विरगावचे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनीही केली पूर्णपरिस्थितीची पाहणी..
गंगापूर – नाशिक भागात सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आज व्यास पौर्णिमा /गुरुपौर्णिमा बेटात महंत रामगिरीजी महाराज यांनी साध्या पद्धतीने साजरी करत पूर परिस्थितीची पाहणी केली.
आज गुरुपौर्णिमा व्यासपूजन निमित्त श्री क्षेत्र सरला बेट येथे आज विविध कार्यक्रम संपन्न होणार होते मात्र नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या भागातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने बेटाकडे येण्यास भाविकांना मज्जावकारात घरीच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे आव्हान महंत रामगिरीजी महाराज यांनी आपल्या लाखो भाविकांना आपल्या घरीच गुरुचे स्मरण करून पूजा विधी करण्यास सांगितले होते त्यामुळे महंत रामगिरीजी महाराज यांनी बेटातील योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायण गिरी महाराज यांच्या समाधी स्थळावर जलाभिषेक करून व्यासपूजन गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली तर नंतर परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनी केली याप्रसंगी उपस्थित असलेले माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी भाविकांच्या सुविधेसाठी श्री क्षेत्र सरला बेटावर मोठा उंचीचा पूल बांधावा जेणेकरून भाविकांना सुलभता येईल यासाठी भाविकांच्या वतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली .याप्रसंगी याप्रसंगी आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी अर्थ बांधकाम सभापती संतोष जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी ,बंडू पाटील वाणी, उद्योजक महेंद्र गोडगे ,बाळकृष्ण कापसे, सचिन दिघे ,बाबासाहेब कांदळकर, बाबासाहेब दिघे ,दत्तू पाटील खपके, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते
प्रतिक्रिया :- शरदचंद्र रोडगे (सहायक पोलीस निरीक्षक, विरगाव पोलीस ठाणे) नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीत ऐशी हजार क्यूसेसनें पाण्याचा विसर्ग केल्याने सरला बेटावर पूर्णपरिस्थिती निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी बेटावर कोणत्याही भक्तांनी येऊ नये असे आवाहन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यानी भक्तांना आवाहन यांनीही केली होती त्यामुळे याठिकाणी भक्त आले नाही मात्र दुपारनंतर पूर ओसरायला सुरुवात झाली आहे.