
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळागडावरील अनेक ऐतिहासिक स्थळे जसे की,अंधारभाव अंबरखाना , तीन दरवाजा ,अशा अनेक ठिकाणी झुणका भाकर केंद्र तयार झाले आहेत. पन्हाळगड म्हटले की झुणका भाकर आणि झुणका भाकर म्हटले की, पन्हाळगड अशी कोल्हापुरात महाराष्ट्रातच ओळख झाली आहे. येत्या पाच वर्षात या झुणका भाकर च्या दुकानावर अनेक लोकांनी आपला प्रपंच उभा केला आहे .या झुणका भाकर मुळे गडावरच्या ५० ते ६० लोकांचे कुटुंब च उदाहनिर्वाह सध्या पन्हाळगडावर चालू आहे.
सुरुवातीला राजेश खोत निकमवाडीचे सरपंच असताना १९९७ पश्चिम बंगाल हैदराबाद येथे ट्रेनिंग साठी गेले होते . त्यावेळी ही संकल्पना त्या ठिकाणी महिला बचत गट ,महिला सबलीकरण, त्यांनी त्या ठिकाणी ही संकल्पना पाहिले होते . ट्रेनिंग चालू असताना त्यांच्या अशा लक्षात आली की ,आपल्या येथे असा झुणका भाकर, थाळी पीठ ,आपल्या येथे चालू शकते.हैदराबाद इथून ट्रेनिंग मधून आल्यानंतरच लगेच त्यांनी त्यांच्या गावातल्या महिलांची मीटिंग घेतली, अनेक महिलांना समजून सांगितले की , असा व्यवसाय तुम्हाला पन्हाळगडावर व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो .तुम्ही झुणका भाकरी घेऊन गडावर जावा आणि येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांना ते तुम्ही विकू शकता .मग माझ्या काकींना ही संकल्पना पटली त्यांचे नाव असे की ,माया पांडुरंग खोत व माझी बहीण ,सुनिता तातोबा निकम, या पन्हाळगडावर डोक्यावरून दही, कांदा ,खर्डा ,झुणका , भाकऱ्या, घेऊन जाऊ लागल्या , त्याबरोबरच थाळीपीठ , पण असायचे त्याला थालीपीठ ला त्यावेळी एवढा प्रतिसाद नव्हता . यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ओमप्रकाश गहाणे होते. त्यांच्या हस्ते रिबीन कापून या टेबल रुपी स्टॉलचे दुकानाचे उद्घाटन त्यावेळी केले गेले होते.रोज चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ लागला मग इतल्या स्थानिक लोकांनी ही संकल्पना पाहिली व स्थानिकांनी पण ह्या संकल्पनेच्या प्रेरणा घेऊन हा व्यवसाय करण्यास सुरुवात झाली .सुरुवातीला या जमिनीवर खालीच टोपलीत घेऊन या निकमवाडीच्या दोन महिला बसत होत्या. नंतर टेबलावर लावायला सुरुवात केली. मग नगरपरिषद ने यांना टेबलावरचे झुणका भाकर ही खोक्याच्या रूपामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाले. राजेश खोत सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची स्वतःची आसरा फाउंडेशन नावाची एनजीओ संघटना आहे तसेच त्यांनी बांबवडे गावाचा आदर्श गाव हा पुरस्कार मिळवून दिला आहे.या गावासाठी सहा कोटी त्यांनी मंजूर करून आणले होते. त्यांचे काम अण्णा हजारे ,पोपटराव पवार, यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. ते कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी संघटनेचे सदस्य होते. तसेच त्यांनी महिला सबलीकरण यावर लक्ष दिले होते .स्वतः च्या पायावर महिला कशा उभारणातील याच्या त्या अभ्यास करत असत. ही संकल्पना त्यांना सुचली होती. त्यामुळे लोक आज या संकल्पनेतून अनेक कुटुंब उभा राहिले आहेत .या संकल्प महत्त्वाची होती फायदा हा कोणाचा पण होऊ दे कोण पण यात मिळून खाऊ दे तसेच ग्रामीण विकास कसा व्हावा हे राजेश खोत यांनी त्यावेळी महिलांना दाखवून दिले होते.
पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माहिती देताना सांगितले की, ही संकल्पना राजेश खोत यांनी आणली होती २००१ च्या आमच्या इलेक्शनच्या अजेंडा मध्ये विषय होता. की, स्थानिक फेरीवाल्यांचे शिस्त लावणे .त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. त्यावेळी एकाच जागा मोठी, एकाची छोटी ,एकाची खोके वेगळे एकाची खूप टेबल वेगळे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इथे वाद-विवाद होत असत म्हणून आम्ही 2001 च्या दरम्यान हे स्टॉल तीन दरवाजा परिसर, अंबरखाना, तबक गार्डन ,सज्जाकोटी परिसरात टाकली व जे काय आज आपल्याला ५०ते ६०लोक चांगल्या प्रकारे स्वतःचा उद्धार निर्वाह करत आहेत .त्याची सोय त्यावेळी झाली होती.त्यावेळी रमेश कासे ही झुणका भाकर टेबलवर पहिल्यांदा लावत होते. गाईड काम करत ते झुणका भाकरीचे दुकान पाहत होते .यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी पहात असत. त्यांचे पाहून अनेक स्थानिक लोकांनी येथे टेबलच्या स्वरूपात झुणका भाकर ताक पर्यटकांना विकू लागले . यामुळे नगरपरिषदचे इन्कम सुद्धा वाढले होते . त्यांना सुद्धा चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु नगरपरिषदचा पैसा मिळवणे हा उद्देश नव्हता आणि नसणार पण महत्त्वाचा विषय होता. इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. आपल्या गावातील लोक बाहेर कामाला जाता कामा नये. हेच उद्दिष्ट आमच्या समोर त्यावेळी होते त्यावेळचे मुख्याधिकारी मॅडम सो .शिल्पा दरेकर त्यांनाही मी संकल्पना दुकानांची सांगितली होती . त्यांनी पण यामध्ये लक्ष घालून चांगल्या प्रकारे काम केले .सगळ्यांना चांगल्या दर्जाची खोकी बनवून दिली .या झुणका भाकर या व्यवसायाला एक चांगली दिशा देण्याचे काम आम्ही त्यावेळी केले होते.
तीन दरवाजा परिसरात पहिली स्थानिक लोकांमधील झुणका भाकर चा टेबल च्या स्वरूपात स्टॉल रमेश कासे यांनी सुरुवात केले . ते गाईड करत होते .आणि इथला झुणका भाकरीचा व्यवसाय चांगला चालू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग पहिल्यांदाच रमेश कासे यांनी ही झुणका भाकर सुरू केली. सुरू केली त्यांच्याकडे एक असेच कस्टमर आले होते. त्यावेळी पन्हाळगडावर ३० वर्षांपूर्वी सुमो गाडी नवीन शोरूम गाडी आले होते.परंतु त्यांना फिरायचे होते बैलगाडीतून मी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आपटी गावातून बैलगाडी भाड्याने आणली .त्यांना संपूर्ण पन्हाळगड या बैलगाडीच्या मधून गाईड व मार्गदर्शन केले. जेवायची वेळ झाल्यानंतर त्यांना मी अनेक हॉटेल दाखवली परंतु त्यांना घरगुती पद्धतीचे जेवण होतं.त्यामुळे ते कुठेच भेटले नाही ते जे पर्यटक होते .त्यांनी म्हटले की, मला की तुम्ही मला तुमच्या घरातच जेवण सुद्धा चालेल जसे की ,झुणका भाकर वगैरे करून देता का? या म्हणून सांगितलं पण मी त्या लोकांना त्यांच्या मागणीनुसार करून सुद्धा दिले.ते त्यांना फार आवडले. आवडल्यानंतर त्यांनी मला असं सुचवलं की, तुम्ही अशा पद्धतीचे झुणका भाकरच दुकान या पन्हाळगडावर घाला त्यांच्या मागणीनुसार मी पत्नीच्या मदतीने हॉटेल हिल टॉप च्या समोर भारतीय बैठक पद्धतीने या ठिकाणी मी ही झुणका भाकर लोकांना खाऊ घालत होतो. व ते फार लोकांना आवडलं . हा व्यवसाय वेटिंग वर पडू लागला . माझ्या कल्पनेतूनच अनेक लोकांनी माझ्या शेजारच्या दुकाने टाकलेत खासकरून कोल्हापुरातून घेऊन येणारे भाडेतत्त्वावर ऑटो रिक्षा, टॅक्सी, हे नेहमीच ग्राहकांना घेऊन येत असत. त्यांचा प्रतिसाद याला फार महत्त्वाचा होता. याचीच कल्पना घेऊन अनेक कुटुंबांनी पाहून हा व्यवसाय पत्करलेला आपल्याला दिसतो यामुळेच अनेकांची संसारे सुरू झालेले पहावयास मिळतात. पूर्वीपासून येणारे आजही कस्टमर माझ्याकडे आत्ता फोनची सुविधा असल्यामुळे फोन लावून येत आहेत.असे रमेश कासे यांनी आपल्याला माहिती देताना सांगितले.
अंबरखाना चुलीवरची सुप्रसिद्ध झुणका भाकर प्रयतकांच्या समोरच बनवून देणारी झुणका भाकरी चे दुकान येथे. या ठिकाणी मातीचे चुल आहे.या तिन्ही दुकानावर समोर खेडेगावात असतात तशा पद्धतीचे मातीवर चुल घातले आहेत.समोर झुणका भाकर तयार करून पर्यटकांना दिले जाते. त्याला अत्यंत अशी मोठी मागणी आहे .लोक या ठिकाणी वेटिंग वर असतात साधे स्वरूपाचे जेवण हे फार लोकांना आवडते. इथल्या शकुंतला मुडेकर यांनी आपला प्रपंच याच झुणका भाकरीवर गेले तीस वर्ष पुढे नेला आहे..पती निधनानंतरकुणाकडे हात न पसरता त्या स्वतःच्या कष्टावर आपल्या कुटुंबाच्या चरितार्थ चालवणारी महिला.पती पांडुरंग मुडेकर जेवण करणार निष्पांजन होते.कोल्हापुरातील हॉटेल सम्राट, मेघदूत हे अनेक हॉटेलमध्ये काम केली होती. आचारी म्हणून त्यांच्या कोल्हापुरात चांगली ओळख होती. १९९८ मध्ये पतीचे निर्णय निधन झाले. पश्चात ३ मुली १ मुलगा असा त्यांचा संसार पुढे न्यायचा होता पतीच्या अचानक निधन मुळे मुलाच्या जबाबदारी शकुंतला मुडेकर यांच्यावर पडली धुणे भांडी करून त्यांनी सुरुवातीला संसार रेटण्याचा प्रयत्न केला.पण त्यांचा त्यात संपूर्ण गरजा भागत नसल्यामुळे त्यांनी अंबरखाना समोर चुलीवरची भाकरी आणि झुणका करून विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी शासनाने दोन रुपयाची झुणका भाकर ही योजना सुरू होती .सुरुवातीला काही दिवस त्यांनी त्रासाची गेले. पण चुलीवरची भाकरी ची चव पुणे मुंबई ,कोल्हापूरकर,लोकांना रुसली व याच मावशीच्या चुली समोर गर्दी होऊ लागली.मावशीला सीजनच्या वेळी दिवसात तीनशे ते साडेतीनशे भाकऱ्या थापाव्यास लागतात.भाकरी चविष्ट दही ,कांदा , मिरचीचा खर्डा हो त्यांची खासियत आहे. तसेच आता त्यांनी भरली वांगी ,ही स्पेशल डिश सुद्धा आता ऍड केली आहे .लोकांच्या मागणीनुसार भात ,भाजी, आमटी ,चहा ,कॉफी मसाले ताक, कोकम सरबत, विक्रीस ठेवावे लागले, शाकाहारी ताटापेक्षा खर्डात दही मिसळून गरमागरम फुगलेली कुरकुरीत भाकरी झुणक्यावर बरोबर खाण्याचा लोकांना फार आनंद मिळत आहे.भाकरी करण्यासाठी बाहेरची कोणी महिला ठेवायची म्हटले तर कामाला अगोदर बायका मिळत नाहीत .मावशीच्या हातची चव दुसऱ्या बाईला हाताच्या येत नाही. त्यामुळे दिवसभर भाकरी तापण्यात मावशीच मग्न असतात. त्यांचा व्हिडिओ अनेक पर्यटक खास करून महिलावर्ग करत असतो व त्यांना अनेक प्रश्न या भाकरीबद्दल विचारत असताना पहावयासआपल्याला दिसते.
याच झुणका भाकरीमुळे इथल्या स्थानिक अनेकांनी कोल्हापूरला कामाला जात होती. त्या लोकांनी आपले काम बंद केले .काही लोक गवंडी , बिगारी, मोलमजुरी करत होती.ते सुद्धा लोकांनी सोडून दिले . या झुणका भाकरी या व्यवसायात पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले आहे. तसेच अनेकांनी आपल्या मुलांचे शिक्षण व घरातील प्रपंच साहित्य व औषध पाणी सर्व या झुणका भाकरीच्या व्यवसायातून उभारलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते. चांगल्या प्रकारचा व्यवसाय पन्हाळगडावर हा झुणका भाकर च्या नावाने उदयास आला इथल्या स्थानिक लोकांना मोठा प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. याबाबत इथले व्यवसायिक फार आनंदी त झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात.
राजेश खोत यांनी इथल्या स्थानिक लोकांना याची कल्पना करून दिली की ,गडावर झुणका भाकर हे चालू शकतं हेच पुढे पन्हाळगडावर येणाऱ्या लोकांना पर्यटकांना फार ही झुणका भाकर आवडत आहे .अनेक लोकांनी दुसरीकडे कामाला न जाता आपले स्वतःचा व्यवसाय सुरू केला. येथे जसे मागणी तसा पुरवठा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाले. इथल्या स्थानिक लोकांनी झुणका भाकरचे दुकाने टाकून आपला चांगला या व्यवसायात जम बसवलेला व पन्हाळगडावर झुणका भाकर चे नाव केलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. एक प्रकारे या लोकांची या दुकानाद्वारे प्रगती झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते . कारण इथल्या लोकांना एक तर शेती नाही सर्व लोक कोल्हापूर एमआयडीसी उद्योमनगर किंवा मोलमजुरी हमाली ,करत असताना पूर्वी दिसत होते. पर्यटन वाढीमुळे व पर्यटकांना जे हवं आहे ते सर्व गडावर मिळत असल्यामुळे येत्या पाच वर्षात येथे भरपूर पर्यटन येत आहेत.पर्यटन संख्येमध्ये वाढ झालेली दिसते. कारण पर्यटकांना हवा आहे ते पन्हाळगडावर मिळत आहे.