
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मोताळा:दि.१५.पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे सॅंडीभाऊ मेढे यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुकाध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी जिल्हाध्यक्ष गौरव खरे,पत्रकार प्रमोद हिवराळे,करणसिंग सिरसवाल,स्वाभिमानीचे जिल्हा नेते दत्ताभाऊ पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.