
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर
पुणे : सैराटमधील ‘सल्या’ उर्फ अरबाज शेख या गुणी व लोकप्रिय अभिनेत्याला पुण्यातून आपल्या गावी जायचे होते, यावेळी ६ वाजता ट्रेन असल्यामुळे तो नांदेड सिटीवरून पुणे स्टेशनकडे यायला निघाला यावेळी रिक्षा चालकाच्या मुजोरपणाचा त्याला चांगलाच प्रत्यय आला. अरबाजाने एक फेसबुक पोस्ट लिहीत याबाबत खुलासा केला आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अरबाज म्हणतो, सगळेच रिक्षावाले असे असतील असं नाही. मी गरीब कुटुंबातील असल्यामुळे मी कधीच ओला, उबेर असले ॲप वापरत नाही. परंतु पाऊस चालू होता. त्यामुळे मित्राने मला रिक्षा करून दिली. नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले. मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्यावर त्याने काही उत्तर दिले नाही. उलट रिक्षावाल्याने ६० रुपये ज्यादा मागायला सुरुवात केली. कशाचे एक्सट्रा पैसे असं विचारल असता रिक्षावाल्याने शिवी दिली.
पाऊस चालू आहे. तू इथेच उतर नाहीतर ६० रुपये एक्सट्रा द्यावे लागतील असे रिक्षाचालकाने ठणकावून सांगून माझी अडवणूक केली. ६ वाजताची ट्रेन पकडायची असल्यामुळे अरबाज त्या ठिकाणी उतरू शकत नव्हता. घडलेला सगळा प्रकार त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. मी त्याला ओळख सांगितली नाही माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे फेस करावे लागत असेल तर गावावरून फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील? असा सवाल यावेळी अरबाजाने उपस्थित केला आहे.
हे कुठे तरी थांबल पाहिजे, अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील असं म्हणत अरबाजने त्या रिक्षाचा नंबर त्याला दिलेले पैशांचा स्क्रिनशॉट देखील फेसबुकवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे यावर सर्वसामान्यांनी कमेंट करत रिक्षा चालकांबाबतचे आपले अनुभव सांगायला सुरुवात केली आहे.