दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत होणार होती ती जवळपास एक वर्ष पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. आहे. राजकारणातील सतत उलथापालथ होत आहे. राज्यातील राजकीय गणिते फिरल्याने मुख्यमंत्री बदल झाल्यामुळे आता स्थानिक महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलली जाणार? भाजपचे शहरातील पदाधिकारी प्रभाग रचना बदलण्यासाठी मोठ्या हालचाली करताहेत. मोठ्या आशेने ठेवून ऑफिस थाटून “तयारी’ करणारे इच्छुक उमेदवार आता मात्र मेटाकुटीला आले आहेत. “इच्छुकां’च्या मनात सध्या तरी विविध शक्यतेमुळे फक्त “धाकधूक”च सुरू असून निवडणूक रिंगणात “टिकून’ राहण्याचे आव्हान पेलावे लागत आहे.
सर्व मतदारसंघात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कामे करीत असलेले इच्छुक नवीन घडमोडींमुळे पुरते वैतागले आहेत. निवडणूक कधी होणार याची वाट बघत चकचकीत कार्यालय, त्यात काम करणारे तीन-चार कर्मचारी, चहापाणी, उठबस करणाऱ्या कार्यकर्त्यांना नाष्टा, तर जमेल तसे अहवालही छापून ठेवले आहेत. तर फ्लेक्सवर चमकूगीरी करणारे गायब झाले आहेत.
