
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:नांदेड जिल्ह्यात व बिलोली तालूक्यात मागील सात दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे बिलोली- देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापुरकर व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांनी लोहगाव, गागलेगाव, बेळकोणी, आरळी आदी गावांना संयुक्त भेटी देवून पुर परिस्थिती व नुकसानीची पाहणी केली. मागील चार दिवसापूर्वी डॉ. मीनलव पाटील खतगांवकर यांनी भर पावसात रामतीर्थ, आदमपुर, थडीसावळी, येथील शेतक-यांच्या थेट बांधावर जावुन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे आज लोहगाव, व आरळी जिल्हा परिषद सर्कल मधील गावांना भेटी दिल्या.
यावेळी प्रताप पाटील जिगळेकर, आनंदराव बिराजदार, केदार पाटील साळुंके, माधव कंधारे, दिलीप पांढरे, संतोष पुयड, लोहगाव येथील नागनाथ नाईनवाड, नागनाथ अनंतवाड, व्यंकटराव पाटील जिगळेकर, प्रकाश वानोळे, गणपत उमरे, दत्ता पांढरे, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसिलदार श्रीकांत निळे, प्रभारी गटविकास अधिकारी शरद देशमुख, तालूका कृषी अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता रायभोगे, शाखा अभियंता गरुडकर, शितळकर, गागलेगाव येथील शंकर पाटील, मारोती पाटील, सरपंच राजेश्वर पाटील, रोडे गुरुजी, बेळकोणी येथील राजेंद्र कापावार, सुधाकर कापावार, सरपंच गणपत वाघमारे, बेंद्रीकर गुरुजी, तिरुपती जाधव, आरळी येथील हाजप्पा पाटील सुंकलोड, ओम पाटील, सिद्राम पांडागळे आदी गावातील न जिल्ह्यात व बिलोली तालूक्यात मागील सात दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापुरकर व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांनी लोहगाव, गागलेगाव, बेळकोणी, आरळी आदी गावांना संयुक्त भेटी देवून पुर परिस्थिती व नुकसानीची पाहणी केली. मागील चार दिवसापूर्वी डॉ. मीनलव पाटील खतगांवकर यांनी भर पावसात रामतीर्थ, आदमपुर, थडीसावळी, येथील शेतक-यांच्या थेट बांधावर जावुन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे आज लोहगाव, व आरळी जिल्हा परिषद सर्कल मधील गावांना भेटी दिल्या.
पावसाने थैमान घातल्यामुळे शेतक-यांच्या शेतातील, मुग, उडीद, सोयाबीन, कापुस, तुर, ज्वारी या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आङे. या पावसामुळे नदीकाठच्या गावातील जमीनी खरडून गेल्या असून अनेकाच्या शेतातील उभे पीक वाहुन गेले आहेत. तसेच ग्रामीण भागातील घराची मोठ्याप्रमाणात पडझड झाली असून कांही शेतक-यांची जनावरे दगावली आहेत.
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक व आर्थिक संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीकांचे, घराचे तात्काळ सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षताही शासनाने घ्यावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकाचे व घराचे तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.