दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेब अंजनगाव सुर्जी यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी,अमरावती यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील २०२१-२२
शासनाच्या कृषी विभाग मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागामार्फत काही अर्ज मागविले असता,कित्येक शेतकयांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज कार्यालयात सादर केल होते त्यानुसार कृषी विभागाने त्यांना फळबाग अनुदान लागवडीसाठी त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यानुसार कित्येक शेतकन्यांनी आपल्या शेतात सीताफळाच्या झाडाची लागवड केली आहे परंतु आज एक वर्ष झाले ते अनुदानापासून वंचित आहे.शेतकरी तहसील मध्ये चक्र मारून त्रस्त झाले आहे.तहसील मध्ये गेले तर सांगण्यात येते की आम्ही तुमचे अनुदान कृषी विभाग अंजनगाव सुर्जी येथे पाठविले.त्यानंतर शेतकरी कृषी विभागात गेले तर तालुका कृषी विभागाचे अधिकारी त्यांना उडुडावीचे कारणे देतात.कृषी कार्यालयाच्या दिरंगाईमुळे अनुदान परत गेले. कित्येक शेतकन्यांचे फळबाग लागवडीचे पैसे परत गेल्यखमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेच सापडला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व रखडलेले अनुदान येत्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख शंभु मालठाने,बाला शेरकर,विद्यार्थी जिल्हाप्रमुख आकाश खारोडे,सनी शेळके,निरंजन गावंडे,बाळु रोंघे,परवेज सौदागर,शुभम निमकाले,स्वप्निल चोरमोले,एवन गायन,ऋषभ नागे,पंकज भांबुरकर,निकेश उंबरकर,राजु पडोळे,उमर अब्दुल्ला,अ.शकील अ.रौफ व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
