दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणीत आज संततधार पावसाचीही पर्वा न करता आपल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
शनिवार बाजार मैदानातून काढण्यात आलेला हा मोर्चा श्री शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे स्टेशन रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर सभेत रुपांतर करण्यात आले.
ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातीनिहाय नोंदणी करा, ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत आगामी काळातील निवडणूका पुढे ढकलला व मंडळ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करा अशा मागण्यांच्या घोषणा देत मोठ्या संख्येने निघालेल्या या भव्य मोर्चाचे नेतृत्व भगवानराव वाघमारे यांनी केले होते. जिल्हाभरातील तालुका स्तर, शहरी भागांसह गावागावातून एकवटलेले पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या मागण्यांसाठी संततधार पावसाची ही पर्वा न करता अगदी उत्साहाने हजर राहिले होते.
