दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी सातारा.पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकांच्या नूतनीकरणासांठी सातारा पालिकेने राज्य शासनांस सादर केलेल्या १६ कोटी १४ लाख रुपयाच्या प्रस्तावांस महाराष्ट्रांचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या स्मारकांसाठी लवकरच निधीची तरतूद करु अशी ग्वाही त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. राज्यांतील विविध कामाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवुन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. साताऱ्यातील पोवई नाका येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आजवर झालेल्या कामाची माहिती खा. उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच सातारा पालिकेने या परिसरांच्या विकासाचा १६ कोटी १४ लाख रुपयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे त्यास मंजुरी देवुन निधी वितरित करण्यांत यावा अशी मागणी त्यांनी केली. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रेरणादायी कार्यासाठी आपण केलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो. या कामासाठी आजच तत्वत: मान्यता देत आहे. प्रस्तावानुसार तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यांची जबाबदारी माझी राहील असे आश्वांसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
