
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी-बालाजी देशमुख
अंबाजोगाई –आय सी टी सी केंद्र सेंटर SETRGMC ग्रामीण रूग्णालय अंबाजोगाई जिल्हा बीड आणि जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष बीड यांच्या संयुक्त विद्यमाने… लिंक वर्कर स्किम प्रकल्पा अंतर्गत… महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते…या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ICTC सेंटर चे समुपदेशक श्री धनराज पवार सर, लॅब टेक्नेशियन विश्र्वास लवंड सर , तसेच STD समुपदेशक श्री.डाॅ.राजकुमार गवळे सर आणि ग्रामीण विकास मंडळ चे DRP श्री रामेश्वर वाघमारे सर , लिंक वर्कर अरुण ताटे, आणि सरिता सुरवसे मॅडम तसेच डिघोळॳबा उपकेंद्रच्या CHO शेख मॅडम,ANM, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्रा.पं.उपसरपंच श्री मिलिंद खरात साहेब आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….या प्रसंगी उपस्थित सर्व गावकऱ्यांना HIV/AIDS विषयी मार्गदर्शन केले त्याच बरोबर व्यसनमुक्ती संदर्भात श्री गवळे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले…,या महाआरोग्य शिबिरात एकुण 119 नागरिकांच्या HIV,STI,HB,SUGER,BP, कोविड लसीकरण, लहान मुलांना लसीकरण, गरोदर मातांची तपासण्या करण्यात आल्या…..या कार्यक्रमाचे नियोजन अरूण ताटे आणि सरिता सुरवसे ताई आणि उपकेंद्राच्या सर्व टिम ने केले