दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याचे पडसाद पुणे जिल्ह्या सह इतर तालुक्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच इंदापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी मात्र काहीही झाले तरी आम्ही सर्व शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबतच रहाणार आहोत असे सांगितले आहे. पाठीमागे काही दिवसांपूर्वीच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे पुतणे केदार दिघे यांनी ही इंदापूर तालुक्यातील शिवसैनिकांची सदिच्छा भेट घेऊन आपण सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी असे आवाहन केले होते.
या सर्व घडामोडी नंतर इंदापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेतील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्यां बैठकीचे आयोजन शुक्रवार दि.२२/७/२०२२ रोजी दुपारी २ वाजता शिवशंभो पॅलेस वरकुटे पाटी, इंदापूर या ठिकाणी करण्यात आले आहे अशी माहिती इंदापुर तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी दिली.
या बैठकीला शिवसेनेचे उपनेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा.श्री.रविंद्रजी मिर्लेकर साहेब,शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री.सचिनभाऊ अहिर साहेब , जिल्हा प्रमुख मा.श्री.महेशदादा पासलकर, विधानसभा संपर्कप्रमुख मा.श्री.दयानंद शिंदेयांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत आणि सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.यामुळे या बैठकीला इंदापूर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
