
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
रोजच पन्हाळागडावर अनेक संघटना कडून शिवप्रेमी,, इतिहासप्रेमी कडून अनेक प्रकारचे मोर्चे, आंदोलन
पन्हाळसंवर्धनासाठी काढण्यात येत आहेत. तसेच आज एक वेगळ्या आगळ्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष तानाजी मोरे यांच्या अध्यक्ष खाली मावळ्यांचे पोशाख घालून, हलगी ढोल ताशे वाजवून,घोड्यावर बसून भारतीय पुरातत्व खात्याचे तसेच प्रशासनाचे विरोधात घोषणा देत पन्हाळा संवर्धन झालेच पाहिजे यासाठी मोर्चा काढला होता.
त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, पन्हाळगड एक आम्हा सर्व शिवभक्तांचे स्मृति स्थान आमचा अमूल्य ठेवा छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या वीर पराक्रमी मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ले पन्हाळगड आजच्या घडीला शेवटच्या घटका मोजत आहे.ज्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज सहा महिने वास्तव्य होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ्यांच्या पराक्रमांची ज्वलंत साक्ष देणारा तमाम शिवभक्तांसाठी प्रेरणादायी, प्रेरणास्थान ,असणारा आमचा पन्हाळा हा वाचवण्यासाठी प्रसंगी आमचे प्राणपणाला लावून पन्हाळगड , पावनगड, संवर्धनासाठी तात्काळ पावले उचलून हे येत्या महिन्याभरात पन्हाळा डागडुजी करून तमाम शिवभक्तांच्या भावना प्रशासनाच्या जपाव्या त्यासाठी आज सोमवार हे आंदोलन बाजीप्रभू चौकातून सुरुवात होऊन तहसील कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आले तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत , पन्हाळा गडावरील दारू दुकान तात्काळ बंद करण्यात यावे ,महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, पन्हाळगडासाठी एक हजार कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात यावे गडावर, वेडिंग फोटोशूटला बंदी घालावी पन्हाळगडाचे पवित्र जपावे ,अशा त्यांनी निवेदनामार्फत मागण्या केल्या आहेत
राम गोसावी यांनी दैनिक चालू वार्ता ला माहिती देत असताना सांगितले की,किल्ले संवर्धन संदर्भात हे रोजच आंदोलन होत आहे.यावर शासनाने योग्य विचार करून यावर निधी उपलब्ध करून लवकरात लवकर करून निधी पन्हाळगडा साठी द्यावे .नाहीतर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातच काय महाराष्ट्र भर शिवभक्त आंदोलन करतच राहणार तसेच जे आंदोलन होत आहे .त्यावर केंद्र सरकारपर्यंत हे आंदोलन पर्यंत पोहोचली गरजेचे आहे .फार महत्त्वाचे आहे. कारण की पन्हाळगड हे केंद्र सरकारच्या देखरेख खाली येत असल्यामुळे सर्व निधी त्यांच्यामार्फतच इथे येऊ शकतो. त्यामुळे इथे आंदोलकांनी वेळ वाया न घालवता भारतीय पुरातत्त्वच्या मुंबई कार्यालय,दिल्ली कार्यालयवर आंदोलन व निवेदन देणे फार गरजेचे आहे.यावर आपल्या जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील खासदारांनी पण लक्ष घालने महत्त्वाचे आहे.