
दैनिक चालू वार्ता तालुका वाडा प्रतिनिधी-मनिषा भालेराव
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामीण कलाकारांच्या सत्कार सोहळ्याचे सोनाक्षी प्रोडक्शनच्या वतीने आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमात गायक, संगीतकार, अभिनय, नृत्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कलाकार
बबलू पाटील, अक्षय भालेकर, यशवंत तेलम, ऋतीका पाटकर, प्रिती भोये, अज्जू जाधव, वैष्णवी पाडेकर आदी कलाकारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रमानपत्र देऊन जाहीर सत्कार केला.
वाडा तालुक्यातील खुपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवारी (दि.२४जुलै) भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संदीप कांबळे, कलाकार नारायण कांबळे, विजय बाराथे, अँड. अविनाश साळवे, जेष्ठ रंगकर्मी सुधीर चित्ते, कवयित्री मीनाताई ठाकरे, माधव गुरव, डॉ.सुनिल भडांगे, रविंद्र मोरे व पत्रकार संजय लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सोनाक्षी प्रोडक्शनच्या सदस्यांना ओळख पत्र देण्यात आले तर, मेंटल मुन्नाभाई या मराठी चित्रपटाचे युट्यूब च्या माध्यमाने प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले. तर सोनाक्षी फिल्म प्रोडक्शनच्या टीमने उत्तम नियोजन केले.