
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा -संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे नुकतेच मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडूंन शनिवारी नुतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वीकारला पदभार स्वीकारताच नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभरात सातारकरांच्या तसेच प्रशासकीय अधिकारी राजकीय सामाजिक विविध संघटनेचे पदाधिकारी पोलीस प्रशासन यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील सर्व वृत्तपत्रांचे दैनिक संपादक व प्रतिनिधी यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी दैनिक चालू वार्ता तसेच सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम पत्रकार संभाजी गोसावी यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी दुपारी सदिंच्छा भेट घेत भव्य स्वागत केले. सातारा जिल्ह्यांचे मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सातारांच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये त्यांची कामगिरीही उत्कृंष्ट आणि कर्तव्यदक्ष ठरली त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची सातारकरांना मात्र नक्कीच आठवण राहील. मात्र राज्य शासनांने त्यांना अद्याप कुठेही नियुक्ती दिली नसल्यांची माहिती समोर येत आहे. सातारांचे पत्रकार संभाजी गोसावी आणि मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा गडचिरोली पासून चांगलाच परिचय होता. शेखर सिंह यांची साताऱ्यांत बदली झाली त्यावेळी गोसावींनी प्रथम सोशल मीडियांच्या माध्यमांतून साहेबांचे अभिनंदन केले होते. गोसावी यांचा सर्व जिल्ह्यांतील आयएएस अधिकाऱ्यांचा चांगलाच परिचय दिसून येत आहे. कोणत्याही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी असो वा पोलीस अधीक्षक असो गोसावी नेहमी सोशल मीडियावरुन किंवा समक्ष जाऊन सदिंच्छा भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांचे स्वागत करतात. गेल्या साडेतीन वर्षापासून हा त्यांचा ध्यासच आहे प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्रांच्या पोलीस विभागांबद्दल त्यांना खूप अभिमान वाटतो. त्यामुळे गोसावी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चांगलेच परिचयांत झाल्यांचे दिसून येत आहे. सातारच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरुन अकोला या ठिकाणी असतानाच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज रोजी सोमवारी दुपारी समक्ष सदिंच्छा भेट घेत जिल्हाधिकाऱ्यांचे गोसावींनी भव्य स्वागत केले. रुचेश जयवंशी राज्य बियाणे महामंडळ अकोल्याचे विस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणारे नवीन जिल्हाधिकारी आणि अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची भारतीय प्रशासकीय विभागांमध्ये ओळख आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे २००९ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अकोला येथील वस्थापकीय संचालक तर हिंगोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती तसेच राज्यांचे महिला बालकल्याण आयुक्त म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवला होता. शुक्रवारी दुपारी नव्या सरकारकडून राज्यांतील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या यामध्ये साताऱ्यांचे रुचेश जयवंशी यांची सातारच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यांत आली. राज्य शासनांने पदभार घेण्यांच्या आदेशावरुन नूतन जिल्हाधिकारी यांनी शनिवारी सातारा जिल्ह्यांमध्ये दाखल होऊन मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे स्वागत केले.शनिवार,रविवार प्रशासकीय सुट्टी असल्यांमुळे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी दिवसभरांत सातारकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.