
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा कंधार तालुक्यात महावितरणमध्ये
M/S The Power Electronical या एजन्सी ने लोहा कंधार तालुक्यात घेतलेल्या कंत्राटी बोगस कामगारांची यांची चौकशी करून बोगस कामगार व संबंधित एजन्सी वर कार्यवाही करावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम दाढेल यांनी केली आहे .
लोहा कंधार तालुक्यात महावितरणमध्ये कंत्राटी कामाचे आय टी आय, शिकाऊ उमेदवारी पुर्ण केलेले तसेच कामाचा अनुभव असलेले कामावर पूर्व कंत्राटी एजन्सीकडे असलेले कामगार असताना देखील त्यांना कामावर न घेता भोगस आय टी आय प्रमाणपत्र असणाऱ्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले ? कसे घेतले त्यांच्या कडून पैसे घेऊन त्यांना कामावर घेतले आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदेड येथील महावितरण अभियंता यांना सदरील प्रकरणाची चौकशी करून याची पूर्ण माहिती घेऊन जे कामगार आय टी आय शिकाऊ उमेदवारी पुर्ण केलेले आहेत अश्याना कामावर घ्यावे व बोगस प्रमाणपत्र असलेल्या तसेच कागदपत्राची चौकशी न करता त्यांना कामावर रुजू करून घेणाऱ्या सबंधित M/S The Power Electricals या एजन्सीला खुलासा मागुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम दाढेल यांनी केली आहे
संबंधित प्रकाराची चौकशी न झाल्यास महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम दाढेल यांनी दिला आहे.