
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा तमाशा सुरू असून या तमाशाचे परिणाम राज्यातील पोलिस दलावर होत आहे.त्यांची काही ही चुक नसताना विनाकारण याचे फळ भोगण्याची वेळ त्यांच्या कुटुंबातील आई वडील भाऊ बहीण यांचे वर आली आहे. वास्तविक पाहता कालावधी पूर्ण झालेले पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या सर्व साधारण बदल्या दर वर्षि माहे एप्रिल व मे महिन्यात होत असतात.अश्यातच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या बदल्या ३०जून पर्यंत करु नये असे आदेश काढले होते.परंतु जून महिन्यांचा कालावधी संपुन जूलै महिना देखिल संपत येत आहे.तरी ही पोलिस विभागातील बदल्या झाल्या नाही त्यामुळे संपूर्ण पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱी वर्गात नाराजीचे सुर उमटले आहे.वेळेवर न होणा-या या बदल्यामुळे पोलिस अधिकारी व या विभागातील कर्मचारी पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना शाळा व महाविद्यालये मध्ये प्रवेश घेतांना तारेवरची कसरत करावी लागते. राजकारणाचा सुरू असलेला तमाशा बाजूला ठेवून राज्य पोलिस दलातील रखडलेल्या बदल्या त्वरित करुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आज गुरुवारला पोलिस बाॅईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष भुवनेश्वर पद्माकर निमगडे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे एका निवेदनातून केली आहे.निवेदन सादर करतांना या असोसिएशनचे पदाधिकारी सद्दाम अंसारी , चंद्रशेखर मुरस्कर , देविदास बोबडे , बशिरभाई अंसारी ,संजय खोब्रागडे, सविता खुटेमाटे, अँड.आशिष नगराळे, लक्ष्मीकांत डोंगरे, दिलीप उरकुंदे, अनिल वैद्य उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक मुंबई व विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना पाठविण्यात आल्या आहे.