दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी
वझरगा ता. देगलूर: येथे आज दिनांक 29 जुलै रोजी दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वझरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ध्वज व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व जि.प.शिक्षण व क्रीडा समिती स्विकृत सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी विद्यार्थ्यांना ध्वज देवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करु, त्यासाठी आपण सर्व सहकार्य करावे असे आवाहन उपस्थितांना केले. व गावकरऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शवत त्यांच्या विचारांचे स्वागत केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व नांदेड जि. प. शिक्षण व क्रीडा समिती स्वि. सदस्य तथा मुख्याध्यापक बस्वराज पाटील वन्नाळीकर, सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, शालेय समिती अध्यक्ष वसंत सुर्यवंशी, माधव सुर्यवंशी, बालाजी टाकळे, शिवाजी वझरगेकर, रमेश सुर्यवंशी, व्यंकट घंटेवाड, व्यंकटेश पाटील वझरगेकर, ज्ञानेश्वर कोकणे, शिवाजी पांचाळ, सौ.देवकत्ते मॅडम, सौ.कांबळे मॅडम, सौ.मिरगाळे मॅडम, तसेच साईनाथ कोकणे, बाळु कन्नावार, संतोष कोकणे, दैनिक चालु वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी आदींसह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. दै. चालु वार्ता च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राबवलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल सर्वांनी मनापासून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आणि भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत. तसेच
दै.चालु वार्ता च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
