
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/गंगाखेड : परभणी जिल्हा स्थानापासून काही अंतरावर एका ट्रॅव्हेल्स व बसचा भीषण अपघात होऊन त्यात सुमारे २५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड, परभणी व अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आल्याचे समजते.
गंगाखेड-परळी रस्त्यावरील करम पाटीजवळ एक ट्रॅव्हेल्स आणि बसचा गुरुवारी रात्री उशीरा भीषण अपघात होऊन त्यात सुमारे २५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक झालेल्या या अपघाताने फी बसमधील प्रवासी अगदी साखर झोपेत होते. अपघात होताच झालेली भयानक टक्कर व त्यात कोण आणि किती जखमी झाले हे काही काळ तरकोणालाही समजेनासे झाले होते.
अपघाताची भीषणता पाहून सभोवतालच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचे औदार्य दाखविले. प्रारंभी तत्परता दाखवत त्यांनी जखमींना तात्काळ गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे असलेली अपूरी जागा व उपचाराविषयीची तोकडी क्षमता लक्षात घेऊन व अधिक वेळ न दवडता त्या जखमींना थेट नांदेड, परभणी व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहिंना किरकोळ मार लागल्याचे बोलले जात आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणावरही वाईट वेळ आली नाही, त्यामुळे परमेश्वराचे ही आभार व्यक्त केले जाणे स्वाभाविक आहे. अमावास्येची रात्र आणि झालेला भीषण अपघात ही मनाला चटका लावून जाणारीच घटना म्हणावी लागेल एवढे मात्र निश्चित.