
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर : – पिक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी तयार केलेल्या चित्ररथाचे उद्घाटन 29 जुलै रोजी नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले . भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या मार्फत शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी पुढील काही दिवस चित्ररथ संपूर्ण तालुक्यात भ्रमण करणार आहे . शेतकऱ्यांमध्ये योजनेबद्दल जनजागृती करून लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा यासंबंधी प्रचार प्रसिद्धी करेल , सदरील चित्ररथाचे नायब तहसीलदार श्री संतोष धाराशिवकर तसचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे मंडळ अधिकारी पंडित जाधव व तलाठी संतोष पाटील तालुका व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी उमाकांत पाटील, गोविंद मेखले तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि शेतकरी उपस्थित होते.