
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सांगली.(जि. मा. का.) : सांगलीचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडूंन आज सायंकाळी पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी कार्यालयांत नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. त्यांनी यापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, मोहिनी चव्हाण, अरविंद लाटकर, दिपक शिंदे, सचिन बारावकर, अजयकुमार नष्टे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जोगेंद्र कट्यारे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, तहसिलदार डी. एस. कुंभार, गणेश शिंदे, किशोर घाडगे, रामलिंग चव्हाण, अनंत गुरव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, अपर तहसिलदार डॉ.अर्चना पाटील, पुनर्वसन अधिकारी तेजस्विनी पाटील आदि उपस्थिंत होते. यावेळी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. गोसावी यांनी सांगलीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांना सोशल मीडियावरुन अभिनंदन करीत सांगली जिल्ह्यांची जवळपास त्यांना दूरध्वनीच्या माध्यमांतून माहिती देण्यांत आली. सांगली जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.मंताडा राजा दयानिधी आणि श्री.गोसावी यांचा जवळपास एक वर्षापासून चांगलाच परिचय आहे.