
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि सिंजेटा इंडीया प्रा.ली. यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र धुळे प्रक्षेत्रावर संपन्न. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे हे होते तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री.शांताराम मालपुरे, उपविभागीय कृषी अधिकारी, धुळे, डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे श्री.तुकाराम औटी,विभागीय विक्री प्रमुख, सिंजेटा, धुळे, कृषी महाविद्यालायचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ, कृषी तंत्र विद्यालाचे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी सिंजेटा, धुळे, तसेच धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी ड्रोन तंत्रज्ञान प्रात्यक्षिका विषयी तसेच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे याकरिता कृषी ड्रोन हे त्यापैकीच निर्माण केलं गेलेलं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे असे नमूद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री.तुकाराम औटी, यांनी ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचा उद्देश समजावून सांगत, याचा वापर हा प्रामुख्याने पीक फवारणी, पीक निरीक्षण, पीक वाढीचे मूल्यांकन, ड्रोन परागीकरण, तण, कीड आणि रोगावर नियंत्रण, पक्षापासून संरक्षण, पिकांची देखरेख इत्यादी अशा विविध अंगाने करता येतो सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सिंजेटा, धुळे च्या सर्व चमूने कृषी विज्ञान केंद्राच्या सोयाबीन बिजोत्पादन प्रक्षेत्रावर ड्रोन फवारणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, तसेच ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याविषयी उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिका मधून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी ड्रोन तंत्रज्ञान समजून घेऊन, त्यामधील तांत्रिक बाबींचे अवलोकन करून, कमी काळात अधिक प्रभावी वापर आणि अधिकतम लाभ याचे उदाहरण असणारे असे ड्रोन तंत्र शेतीत कृषी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या कडे लक्ष देत शेतकरी बांधवांनी वाटचाल करावी असे आव्हान करत मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे आभार प्रदर्शन डॉ.पंकज पाटील यांनी मानले. कृषि प्रशिक्षण यशस्विते साठी कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, कृषी महावियाल, तंत्र विद्यालय, सिंजेटा, धुळे, यांचे सहकार्य लाभले.