दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बावडा गावातील मुख्य ठिकाणी व संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व पोलिस गस्त वाढविण्याची मागणी शेतकरी संघर्ष समिती बावडा, यांनी बावडा ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर पंडितराव पाटील, धैर्यशील पाटील, पवनराजे घोगरे, शशिकांत आगलावे, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुरेश शिंदे, विजय घोगरे, तुकाराम घोगरे,युन्नुस मुलाणी, इत्यादी पदाधिकार्यांनी सह्या केल्या आहेत.
