
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:
नांदेड जिल्हा परिषदेच्या ७३ गटाचे त्याचबरोबर १६ पंचायत समितीतील १४६ गटाचे आणि जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली. आता कोण कोणत्या गटातून, गणातून आणि प्रभागातून निवडणुक लढणार? याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पक्षांच्या नेत्यांनी तगड्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्याचबरो छुक उमेदवारांनी देखील चाचपणी सुरू केली असून ਵਈਜੇ ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे.
येत्या तीन महिन्यात नांदेड जिल्हा परिषद, १६ पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या दहा नगरपालिका आणि हिमायतनगर नगरपंचायतीची निवडणुक होणार असल्यामुळे त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने गुरूवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीकडे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आणि इच्छुकांचे लक्ष लागले होते. ओबीसी प्रवर्गाचेही आरक्षण झाल्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या आरक्षणानुसार सर्वच पक्षाची नेतेमंडळी तगड्या उमेदवारांच्या शोधात लागली आहे.
जिल्ह्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच
जिल्ह्यात भाजपचे भीमराव केराम (किनवट), ਵੱ
तुषार
राठोड (मुखेड), राजेश पवार (नायगाव) हे त दार
आणि राम पाटील रातोळीकर हे विधानपरिषदेच आमदार
आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीने या निवडणुकांसाठी
जोरदार प्रयत्न करण्यात येतील. तसेच शिंदे गटासोबत युती होणार का? असे प्रश्न भविष्यात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काय भूमिका घेणार? ते महाआघाडी करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत निवडणुका लढवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाआघाडी किंवा युती झाली नाही तर सगळे स्वबळावर लढतील त्याचबरोबर एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, मनसे, आप, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी यासह इतर छोट्या मोठ्या पक्षाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती ?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांची मांदियाळी सर्वच पक्षात होणार असल्यामुळे बंडखोरी, पक्षांतरही अटळ आहे. त्यामुळे निवडणुका लढविताना ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही जण निवळीच्या रिंगणात उतरणारच. त्यामुळे उमेदवारी देर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक इच्छुकांची स्थिती देखील सध्या ‘
कोणता झेंडाघेऊ हाती ?” अशीच झाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांची
मांदियाळी सर्वच पक्षात होणार असल्यामुळे बंडखोरी, पक्षांतरही अटळ आहे. त्यामुळे निवडणुका लढविताना ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच. त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक इच्छुकांची स्थिती देखील सध्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती ?’ अशीच झाली आहे.
वर्चस्वासाठी…..
नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आत्तापर्यंत वर्चस्व होते. मात्र, महाआघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आले. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील तसेच आमद जी कल्याणकर हे दोघेजण मुख्यमंत्री शिंदे यांच्या गट खल झाले आहेत.