
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर – छत्रपती संभाजीनगरसह गावोगावी ,स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण घरो घरी राबविण्यात यावी असे आवाहन गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यानी पदाधिकऱ्यांना केले आहे.
दरम्यान संजय कोडगे मराठवाडा संघटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व हरिभाऊ नाना बागडे माजी विधानसभा अध्यक्ष, आ.अतुल सावे,जिल्हाध्यक्ष विजय औताडे,आदी यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संभाजीनगर येथे पार पडली.यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली यावेळी लोकसभेचे प्रभारी आ. बंब यानी स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण घरो घरी राबविण्या संदर्भात सूचना दिल्या असून जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट व पंचायत समिती भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले आहे.