
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मैत्रीचं नातं अधोरेखित करत दोस्तीची नवी व्याख्या सांगणारा रूप नगर के चीते हा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मुहूर्तापासून पोस्टर रिलीजपर्यंत कायम चर्चेत राहिलेला हा चित्रपट मैत्रीचे नवे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.
या चित्रपटातील मित्रांच्या जोडगोळीला चारचौघींच्या ग्लॅमरचा तडका देण्यात आला आहे. या चारचौघी कोण? याबाबत जाणून घेण्यास रसिकही आतुरले आहेत. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी रूप नगर के चीते या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विहान सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे