
दैनिक चालु वार्ता शिरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पुणे – सध्या परिस्थितीत अनेक नागरिक बेघर आहेत. त्यांना शहरात भाड्याने राहण्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी घराच्या भाडेदराची होणारी वाढ बघता जगणे असह्य, मुश्किल होऊन जात बसले आहे. स्वतःचे घर निर्माण करणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात चटणी भाकरी खाऊ मात्र डोक्यावर आपले स्वतःचे छप्पर असले पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना समस्त भाडेकरू आणि बेघर नागरिकांच्या आहेत.
भाडेकरू नागरिकांना भाड्यापासून मुक्ती मिळविण्याकरता आणि त्याचबरोबर स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी भारतीय निवारा परिषद या संघटनेची स्थापना केली आहे.
भारतीय निवारा परिषद स्थापन करत असताना नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे यासाठी प्रामुख्याने काम केले जाणार आहे. भारतीय निवारा परिषदेची स्थापना त्याच सोबत बेघर आणि भाडेकरू नागरिकांचा आज रविवार दिनांक 31 जुलै रोजी साने गुरुजी स्मारक, राष्ट्र सेवा दल, दांडेकर पूल, पुणे येथे आयोजित केला आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा होणार असून या कार्यक्रमास माजी नगरसेवक राहुल तुपेरे, संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे, फुले- शाहू- आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
स्वतःच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी समस्त बेघर आणि भाडेकरू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय निवारा परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
#भारतीय_निवारा_परिषद #भारतीयनिवारापरिषद #रुग्णहक्कपरिषद #रुग्ण_हक्क_परिषद #rhp #उमेश_चव्हाण #उमेशचव्हाण #umeshchavan #bhartiyniwaraparishad #rugnahakkparishad