
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
दौंड :तालुक्यातील वाटलुज येथे मोकाटकुत्र्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये 5 मेंढ्यांचा जागीच ठार झाल्याची व अकरा मेंढ्या जखमी झाल्या ही घटना (दि ३०) दुपारी घडली.
वाटलुज येथील पाराजी रुखमाजी शेंडगे वय (६०) व पाळीव मेंढ्यासह शनिवारी दुपारी मेंढ्या चारत असताना मोकाट कुत्र्यांनी या कळपावर हल्ला केला.
त्यावेळी त्यांच्यासोबत दिलीप भाई रमजान शेख वय (७५) दत्तात्रय पांडुरंग खाडे हे सोबत होते यावेळी मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला
यामध्ये 5 पाळीव मेंढ्या मृत्यमुखी पडल्या. सुमारे 30 ते 35 हजारांची नुकसान शेतकर्याची झाली असून तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, नाहीतर हे लोकांवर ते सुद्धा हल्ला करू शकतात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकर्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी यांनी व्यक्त केले.