
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर प्रतिनिधी दि.३१/०७/२०२२
आज ख्यातनाम गायक दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने शहरातील पद्मश्री मोहम्मद रफी मार्ग या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.
येथील साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपाई जेष्ठ नेते लक्ष्मणराव तिकटे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून अकादमीचे उपाध्यक्ष सय्यद याखूबभाई,हाकीमभाई पिंजारी,इशरत कादरी, मोहम्मद आरीफभाई, कमलाकर गायकवाड,शेख रहीमभाई,आबेदखान पठाण,रवी बनसोडे,अनिल वाघमारे,सावळाराम बनसोडे,राहूल सूर्यवंशी, शरद लामतूरे,महादेव तिगोटे,सूरेश सोनकांबळे, बाबू गूट्टे,बालाजी वाघमारे, मिलींद ससाणे, सतिश कदम,आदित्य भालेराव, पत्रकार अजयराव भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी अकादमीचे अध्यक्ष डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर आभार इशरत कादरी यांनी मानले.