
दैनिक चालू वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणा-या महा मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात याव्यात अशी मागणी एमआयएम पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य महा मार्गावर स्वागत कमानी उभारण्याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहराचे एमआयएमचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष धम्मराज साळवे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.दरम्यान पिंपरी-चिंचवड शहर देशात व राज्यात स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. पिंपरी-चिंचवड शहराचे नावलौकिक व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या देश व जगातील नामांकित कंपन्या तसेच प्रशस्त रास्ते मेट्रो भव्य उद्यान संस्कृती सभागृहे सायन्स पार्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगविख्यात भीमसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी, भक्ती शक्ती स्मारक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुर्णाकृती स्मारके अशा सर्व राष्ट्र महापुरुषांची भव्य दिव्य स्मारके आहेत. त्यामुळे शहरांची देशभरात व जगभरात खूप चांगली अशी ओळख निर्माण झाली आहे. यामुळे शहराला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक मान्यवर नागरिक पर्यटक येत असतात. यामुळे शहरांच्या सौंदर्यात आणखीन भर घालण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या दापोडी, निगडी तसेच मुख्य महा मार्गावर भव्य व आकर्षक आशा स्वागत कमानी उभारण्यात याव्यात अशी मागणी एमआयएमचे पिंपरी-चिंचवड शहरध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.