
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर (रुई )तालुका जिल्हा यवतमाळ येथील तरुण शेतकरी वसंत ब्रम्हा जाधव वय ५० या शेतकऱ्यांनी कर्जापाई आत्महत्या केल्याने सर्वत्र दुःखाचे वातावर पसरले वसंत याच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ वेक्त करण्यात येत आहे अतिवृष्टीने मुळे शेकडो शेतकऱ्याला फटका बसला अनेक शेत पडीत पडण्याच्या मार्गावर आहे.प्रत्येक शेतकर्यांनी तिबार पेरन्या केल्या यात जाधव यांनीही तीबार पेरणी करूनही शेतातील पीक आलेच नसल्याने कर्जाचा डोंगर वाढतच होता अलाहाबाद बँकेचे तर मध्यवर्ती बँक चे कर्ज खाजगी सावकाराचे कर्ज पावसाने शेती निकामी झाल्याचा पछाताप करीत यावर्षी नाला लागत शेती असून पीक होत नसल्याचे पाहून ३०जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतात जाऊन फवारणी करण्याकरिता आणलेले कीटक नाशक औषध स्वतः प्राशन केले रुई ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग एक मधील गट नंबर १२३ शिवारात शेती असल्याने या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकाची लागवड केली होती परंतु अतिवृष्टीने पीक वाया गेले आलेच नाही याचाच विचार सतत मनात खेळत असल्याने वाढत असलेले कर्ज कशाने फेडावे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता इंडियन बँक भाब राजा मध्यवर्ती बँक भाब राजा व ट्रॅक्टर चे हि फायन्स वाढतच असल्याने त्रस्त झाला होता त्याच्या कडे आठ लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याने अखेर हताश होऊन आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
शासनाने त्वरित दखल घेऊन जाधव कुटुंबास तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी करण्यात येत आहेत.