
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
=============≈≈====
जिल्हा परिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 चे बिगुल वाजले आहे..सोडत निघाल्यापासून संभाव्य उमेदवार कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नेहमीप्रमाणे दादा आणि अप्पा गटामध्ये लढत होईल असे चित्र असेल तरी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शेतकरी,कामगार,दुर्बल घटकांसाठी काही वर्षांपासून वेगवेगळ्या आंदोलनातून जनमानसात स्वतःचा ठसा उमटविणारा प्रहार जनशक्ती पक्ष या निवडणुकीत
जनतेसमोर जाणार असल्याचे समजते.
कानगाव – गोपाळवाडी गटामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका सरचिटणीस श्री.शैलेश भाऊसाहेब शिपलकर पक्षाचे संभाव्य उमेदवार असणार आहेत.वरवंड येथील वीजवितरण कंपनी विरोधातील शोले स्टाईल आंदोलनात त्यांची अभ्यासपूर्ण भूमिका,अधिकारी वर्गाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.केंद्रातील तीन कृषी कायदे,वाढती महागाई विरोधातील हलगी बजाव आंदोलन,कुरकुंभ एमआयडीसी मधील स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्या आणि प्रदूषण या विरोधातील बोंबाबोंब आंदोलन या मधील त्यांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे असाच तरुण वर्गाला आकर्षित करणारा चेहरा उमेदवार म्हणून देण्यात येणार असल्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.रमेश भाऊ शितोळे यांनी म्हटले आहे.तसेच त्यांचे मोठे बंधू श्री.निलेश भाऊसाहेब शिपलकर ग्रामपंचायत कडेठाण चे विद्यमान सदस्य आहेत.शेतकरी प्रश्नाची जाण,सर्व जाती
धर्मातील मित्रपरिवाराला सोबत घेऊन सामाजिक कार्यातील सहभाग,परिसरातील गावामध्ये जनसंपर्क असल्याने एक कडवी झुंज या गटामध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.