
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””“””””””””””””””””””””””””””””””
परभणी : शहरापासून काही अंतरावरील गंगाखेड -परळी दरम्यान करम पाटीवर नुकताच झालेल्या बस-ट्रॅव्हेल अपघातात बसचा चालक मृत्यू पावला आहे.
गुरुवार, दि. २८ जुलै २२ रोजी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला होता. सदर अपघातात जखमी प्रवाशांना उपचारासाठी नांदेड, परभणी, अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.
बसचे चालक श्री व्हावे यांना परभणी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा काल मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित रुग्ण प्रवासी सुखरूप असल्याचे कळते.