
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अतिवृष्टीचे अनुदान सरसकट नांदेड दक्षिण व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देणार असे प्रतिपादन नांदेड दक्षिण चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
जुलै महिन्यात नांदेड दक्षिण, लोहा तालुक्यासहित संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सलग १५ ते २० दिवस संततधार पाऊस पडून सोयाबीन, कापुस, ज्वारी,तुर,मुग ,उदीड या खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तेव्हा त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी प्रत्यक्ष अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शासन व प्रशासनाडे मागणी केली आहे व याची दखल शासन व प्रशासनाने घेऊन नांदेड दक्षिण व लोहा तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक,व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
ज्या गावात तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक पंचनामे करण्यासाठी आले नाहीत तर मला कळवा असे आवाहन आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले आहे.