
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे तिकीट आपल्याला मिळावे म्हणून अनेक इच्छुक उमेदवार हे गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे नांदेड दक्षिण चे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या कार्यालयात येत असुन कार्यालयात नांदेड दक्षिण मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत यात नांदेड जिल्हा परिषद, नांदेड महापालिका सह आदी संस्थेवर एकहाती काँग्रेस पक्षाची सत्ता आहे.
नांदेड जिल्ह्यात व नांदेड दक्षिण मतदार संघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे झाले आहेत.
आगामी जिल्हा परिषदे निवडणूकी मध्ये मध्ये पुन्हा काँग्रेसच झेंडा नांदेड जिल्हा परिषदेवर फडकेल यात मात्र तिळभर शंका नाही अशी चर्चा जनतेतून व इच्छुक उमेदवारां मधून होत आहे. त्याकरिता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तिकीट आपल्याला मिळावे म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची भेट घेऊन मागणी करीत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून आ. मोहन अण्णा हंबर्डे हे त्यांच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयात असुन त्यांना अनेक इच्छुक उमेदवारां बरोबरच नांदेड दक्षिण मतदार संघातील अनेक नागरिक विविध कामांसाठी नागरिकांनी रिघ लागली आहे.