
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
दिनांक ३१/७/२०२२ रोजी इंदापूर तालुका विरशैव लिंगायत संघटना इंदापूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा निमगाव केतकी येथे पार पडली.
यामध्ये निमगाव केतकी मधील सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे युवा नेते श्री बाळासाहेब जयकुमार लोणकर यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच या वेळी विरशैव लिंगायत संघटनेची नवनिर्वाचित इंदापूर तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी श्री सदाशिव विठ्ठल उंबरदंड (सर), सचिव पदी अतुल सोमनाथ होनराव, यांची निवड करण्यात आली. या मिटींगला वीरशैव लिंगायत समाज पुणे जिल्हाध्यक्ष श्री केशव नगरे ,प्रांतिक सदस्य मल्लिकार्जुन हिंगणे, माजी तालुकाध्यक्ष मोहन तात्या गुळवे, माजी अध्यक्ष गणेश ठिगळे, माजी उपाध्यक्ष अतुल होनराव, माजी सचिव रवी तांबे, संदीप आप्पा गुळवे, बलभीम निलाखे ,गजानन निलाखे तसेच निमगाव केतकीचे लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विघ्नेश हिगाणे निमगाव येथील सर्व लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.