
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: काल सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली.
ईडीची चौकशी करून खा संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल यांच्या वक्त्यावरून उठलेल्या गोंधळाकडून निसटण्यासाठी ईडीची कारवाई केली असल्याचा आरोप थोरात यांनी भाजपवर केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यपाल यांच्या वक्त्यावरून उठलेल्या गोंधळाकडून निसटण्यासाठी ईडीची कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईच्या घटनेकडे मी कसा पाहतोय यापेक्षा महाराष्ट्रासह देशातील जनता कशी पाहते हे महत्वाच आहे. तपास यंत्रणेचा उपयोग हा देशाच्या हिताकरता न करता राजकारणासाठी केला जात आहे, असंही थोरात म्हणाले.
एखादी गोष्ट हट्टाला पेटल्यासारख दिसत आहे. राज्यपालांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. या वातावरणातून जे शिंतोडे भाजप आणि राज्यपालांवर उडतायत त्यातून निसटण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. तपास यंत्रेणेचा राजकारणासाठी सत्तेचा दुरूपयोग होतोय असच जनता म्हणणार ही वस्तुस्थिती आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.