
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जाताहेत, आता काल सुध्दा आपल्यातला एक तिकडे गेला त्याची प्रतिक्रिया पाहिली. कशासाठी लोक चाललीय? दुसरा मुद्दा काल मी एक पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती? राज्यपालांच्या विरोधात नाही, कोश्यारीच्या विरूद्ध! त्यांना राज्यपालपदी बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज्यपाल म्हणजे हे पद फार मोठ आहे. त्या पदाचा मान जसा आपण राखतो तसा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने तो राखण्याची गरज आहे. भाजपचे जे कारस्थान आहे हिंदूंमध्ये फुट पाडायची मराठी अमराठी करायचं, मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी ही संघटना ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. मोकळ कुरण मोकळ पडलय चरत बसा. कुरण म्हणजे गवत. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नातं तुटलं, तुटू शकत नाही. त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही. तुटणारच नाही पण त्यांच्या प्रयत्नच तसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं की ती जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.