
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी –
भूम : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती भूम शहरात साजरी करण्यात आली.या जयंती सोहळ्यात प्रतिमेचे पूजन जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ संयोगिताताई गाढवे तसेच गटनेते श्री.संजय(नाना)गाढवे यांनी केले व यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. युवा नेते साहिल आप्पा गाढवे यांच्या हस्ते साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या रक्त दात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी मा.नगरसेवक श्री सुमित तेलंग,श्री सुरज गाढवे,चेतन शाळू ,संदीप गाढवे ,आबा पवार, माजी नगरसेवक सागर टाकले,संजय पवार, विधान साभा समन्वयक दिलीप शाळू,सुनील थोरात,तोफिक् कुरेशि,संजय साबळे,मुशीर शेख,बालाजी अंधारे,माजी नगरसेविका विजया अण्णा साठे, निराजबेगम सय्यद,अनिता साठे,आश्विनी साठे,कीर्ती साठे,नेहा साठे.लोकप्रतिनिधी ,पत्रकार,पोलीस अधिकारी व इतर मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला.साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय साठे यांनी केले तर आभारप्रदर्शन अमोल गायकवाड यांनी केले.यावेळी भारतीय मातंग युवक तालुका अध्यक्ष श्री.भारत श्रावण साठे,माजी नगरसेवक सुमित तेलंग,अण्णा साठे,दत्ता साठे तसेच हनुमंत साठे,साहेबराव साठे,श्रीरंग साठे,बाबा गायकवाड आदी उपस्थित होते.या जयंती सोहळ्यासाठी जयंती कमिटीने अथक परिश्रम घेतले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.