
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका -मनिषा भालेराव
केरळ ते लडाख हा तीन हजार सातशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून योगाचे महत्व व फायदे सांगत जणजागृती करत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अग्रीमा नायरचे वाडा पोलिसांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तर वाड्यातील पां. जा. महाविद्यालय व आ. ल.चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय येथील के.डी. गंधे सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात, शानदार स्वागत केले आग्रीमा हिने आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या प्रवासातील प्रसंग सांगत येणाऱ्या अडीअडचणींवर ती स्वतः खंबीर कशी उभी राहिली ते सांगून विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या व त्यांनी विचारलेल्या प्रशांची उत्तरे अगदी हसतमुखाने दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक रविंद्र पाटील, उप मुख्याध्यापक बी. के. पाटील, नगरसेविका रीमा गंधे, नयना इंगळे, स्नेहल शिंगरी आदी उपस्थित होते.