दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने देखील आत्महत्या करुन जिवन संपविल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे उघडकीस आली आहे. कल्पेश राजू गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.
मांजरी येथील पंढरीनाथ रघुनाथ पारे याने मंगळवारी नैराश्यातून आत्महत्या केली. यानंतर पंढरीनाथ याचा जिवलग मित्र कल्पेश खुप दुःखी झाला. मित्र सोडून गेल्याचे दुःख त्याला सहन झाले नाही, आणि त्याने देखील विषारी द्रव्य घेऊन आपले जीवन संपविले. या दोघांच्या मैत्रीची चर्चा सध्या परिसरात चांगलीच सुरू असली तरी या घटनेमुळे मात्र मांजरी गावावर शोककळा पसरली आहे.
