दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड दि.५ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आली असून कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.डि.एल.गुडमेवार तर सचिवपदी डॉ.प्रदीपसिंह राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात दिनांक २८ जुलै २०२२ रोजी मावळते अध्यक्ष डॉ.संजय केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कंधार डॉक्टर्स असोसिएशनची एक महत्वपुर्ण मिंटींग घेण्यात आली होती,त्या मध्ये ही निवड करण्यातआली,उर्वरित कार्यकारणीमध्ये महिला डॉक्टरांचाही सहभाग असावा म्हणून नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गुडमेवार यांच्याअध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट रोजी मिंटींग घेण्यात आली व त्या मधे उपाध्यक्ष डॉ.रहिम पठाण,सहसचिव डॉ.राम फुलवळे,प्रसिद्धीप्रमुख डॉ.माधव कुद्रे,कोषाध्यक्ष डॉ.तक्षशिला पवार,महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.उषा जाधव व डॉ.मिनाक्षी सादलापुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्ष व सचिव निवडीचे सुचक जेष्ठ चिकित्सक तथा नगरसेवक डॉ.दिपक बडवणे हे होते तर अनुमोदन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भगवान जाधव,बालरोगतज्ज्ञ डॉ.संजय केंद्रे यांनी केले.कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या बैठकीमधे माजी पं स.सदस्य डॉ.एल.व्हि.जायभाये,
डॉ.रामभाऊ तायडे,डॉ.यशवंतराव पाटील तेलंग,डॉ.बालाजी मद्रेवार,फिजिशियन डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे, डॉ.बालाजी कागणे, डॉ.कैलास फाजगे,दंतशल्य चिकित्सक डॉ.संतोष पदमवार,डॉ.राजेश्वर पांचाळ,डॉ.भगवान वाघमारे, तर महिला डॉक्टर्स म्हणून डॉ.दिपाली तायडे,डॉ.अर्चना जाधव, डॉ.मिनाक्षी प्रकाश सादलापुरे,डॉ.उषा मारोतराव जाधव,डॉ. श्वेता दासरे,डॉ.धनश्री मेनकुदळे,डॉ.दिपाली गोरे, नवीन सदस्य म्हणून डॉ.प्रवीण जाधव,डॉ.नागरगोजे, डॉ.
कल्याणकस्तुरे, डॉ.राहूल ढगे,डॉ.लक्ष्मिकांत पेठकर,याचा समावेश करण्यातआला.
कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या या महत्वपुर्ण बैठिकेचे प्रोसेडिंग प्रक्रिया व संचलन श्री सद्गुरु हॉस्पिटल,कंधारचे संचालक तथा कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या सचिवपदी निवड झालेले डॉ.प्रदीपसिंह राजपूत यांनी केले.
