
दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी-सलमान नसीम अत्तार.
धाड येथून जवळच असलेल्या ढालसावंगी गावात राहणाऱ्या एका 36 वर्षीय तरुणाचा शेतातील गोठ्यात लाईन जोडणी करताना विजेचा जोरदार शाँक लागुन झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना दुपारी साधारण 1:30 वा दरम्यान घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार ढालसावंगी येथील प्रदिप अंबर गिरी वय 36 तरुण आपल्या वडीलांच्या सोबत गट.न.34 मधील शेतात गेला असता जनावरांच्या गोठ्यात लाईट व्यवस्था करण्यासाठी प्रदिप याने विद्युत वायर मध्ये जोडणी करताना त्यास विजेचा जोरदार शाँक लागला दरम्यान त्याचे वडील विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी गेले होते,
परंतु याठिकाणी प्रदिप याला विजेचा शाँक लागुन तो जमीनीवर कोसळला दरम्यान घटनास्थळी त्याच्या वडिलांनी धाव घेतली व आसपासच्या शेतकऱ्यांना आवाज देऊन प्रदिप गिरी यास तातडीने बुलढाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
या प्रकरणी धाड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत नोंद केली आहे.
मृतक प्रदिप गिरी यांच्या पश्चात त्यांना आई,वडील, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.
या घटनेने धाड भागात हळहळ व्यक्त होत आहे.