
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
जानापुरी :- लोहा तालुक्यातील जानापुरी सेवा सोसायटी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीला लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झाले असून विरोधकांनी बरेच आरोप केले होते. पण जानापुरी सेवा सोसायटीच्या वतीने सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर, बळीराम पाटील कदम, पुंडलिक मारोती कदम, पांडुरंग हारी कदम, माधव बालाजी कदम, रावसाहेब दत्ताराम कदम, संतोष प्रकाशराव कदम, देवराव पांडुरंग कदम, पवळे रामा गोपाळ, कदम इनावती उत्तमराव, कदम प्रयागबाई दिनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनिबंधक बि. बि. बोधगीरे साहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्वत्र जानापुरी सेवा सोसायटीच्या विजयाची चर्चा सुरू आहे. प्रतापराव पाटील यांचा गल्ली ते दिल्ली झेंडा फडकला आहे.