
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा-शाम पुणेकर
पुणे: शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन झालं आहे. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कँन्सर सारख्या गंभीर आजाराने पाचर्णे यांना ग्रासले होते. अखेर आज सकाळी उपचारादरम्यान, पाचर्णे यांची प्राणज्योत मालवली.
दोनच दिवसांपूर्वी पाचर्णे यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत डॉक्टरांकडून तब्येती माहिती घेतली होती. त्यांच्या जाण्याने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.