
दैनिक चालु वार्ता पुणे जिल्हा उपसंपादक- शाम पुणेकर.
पुणे: रस्ता नसल्याने पुण पुण्यातील सिंहगड सिटी स्कूलला सुट्टी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शाळेला जाणारा खासगी रस्ता जागा मालकाने बंद केल्यामुळे शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला कल्पना दिली असतानाही कुठलीही कारवाई झाली नाही. दोन्ही बाजूंनी पत्रे लावून जागामालकांनी रस्ता बंद केला आहे. या शाळेच्या जवळपास ४० ते ४५ बसेस आहेत. मात्र, जागामालकाने रस्ता बंद केल्याने बस शाळेच्या पार्किंगमध्येच अडकल्या. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळा बंद करावी लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. महापालिकेकडून याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचेही शाळेने म्हटले आहे. मूळ जागा मालकाने वहिवाट बंद केली आहे.
मंगळवारी शासकीय सुटी होती. बुधवारी शाळा ऑनलाइन भरविण्यात आली. गुरुवारी रक्षाबंधनानिमित्त सुटी होती. आता शुक्रवारी शाळा कशी भरवायची, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला.