
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सृष्टीवर अस्तित्वात असणार्या सर्वच क्षेत्रात आणि वेगवेगळ्या व्यवहारात संबंधात खरा हा दुर असतो .तर नकली हा जवळीक साधुन लाभ करून घेऊन पुन्हा शत्रू यादीत समाविष्ट होतो .हे सध्याच्या काळातील निष्ठेच्या व्यापारातील वास्तविक फलित आहे .नाव फक्त निषठेच आहे. पण अडुन व्यापार चालु आहे. कोण गृहक? कोण व्यापारी ?हे गुपित उशिराने कळते आणि तो पर्यंत खरा निष्ठावान हा अक्षरशः पायदळी तुडवला जातो . परंतु खरा निष्ठावान हा या व्यापाराचा घटक नसल्याने तो सदैव आत्मियतेने निष्ठावान च असतो . सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आपण किती निष्ठावान आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न सगळं क्षेत्रात होत आहे .पण या निष्ठे आड स्वार्थ नसेल तर अभिनंदन आहे. पण निषठेआड जर स्वार्थ असेल तर मग ती निष्ठा कसली तो चक्क व्यापार आहे . हल्ली निष्ठा हि कशी मोजायची हाच खुप मोठा प्रश्न आहे.स्वार्थ किंवा विशिष्ट हेतूने प्रेरित होउन आपल्या सोबत जोडला गेलेला व्यक्ती निष्ठावंत या गोंडस नावाखाली आपल्या सोबत असतो. खरा पण तो आत्मियतेने कधीचं आपला नसतो .हि बाब आपल्याला कळत नाही कि कळुन वळत नाही कि वेळेचा प्रभाव आहे. हे मात्र वेगळं गणित आहे.जस गुळाची ढेप आहे तोपर्यंतच मुंगळे असतात. आणि ढेप संपली कि ते दुसरी ढेप शोधतात.या मध्ये मुंगळयांचा दोष अजिबात नाही. ते ढेपी शिवाय राहु शकत नाहीत . आणि नविन ढेप शोधण्यासाठी निष्ठावंत होण्याशिवाय पर्याय नसतो.महणुनच तर मी खूप निष्ठावान आहे .हे वरकरणी दाखवून द्यावे लागते . म्हणुन च स्वार्थासाठी निष्ठावंत होणारांचा सगळीकडे बोलबाला आहे. असंच चित्र आपण सध्या सर्वत्र पाहतोय. मात्र आपल्या स्व स्वार्थासाठी क्षणिक निष्ठावंत होऊन स्वतःला आणि ज्यांच्या साठी आपण क्षणिक निष्ठावंत होऊन. त्याला अंधारात ठेवण म्हणजे आपण आपल्या स्वतःलाच फसवतोय .पण हे कळण्याची समज आणि उमज हि त्या क्षणाल आपल्याकडं नसते. म्हणून आपल्याला आपण आपलं ते कृत्य त्या क्षणी योग्य आहे. असंच समजतो . परंतु अशा पद्धतीने स्वार्थासाठी निष्ठावंत होण्यापेक्षा दुर्लक्षित एकनिष्ठ असलेल कधींही नैसर्गिक आणि आत्मिक दृष्या योग्य आणि समाधान कारक आहे . नात्या पासुन गोत्या पर्यन्त, व्यापारा पासुन उदयोगा, पर्यन्त समाजकारण पासुन, राजकारणा पर्यन्त सगळीकडे जो प्रामाणिक निस्वार्थी निष्ठावंत आहे. तो दुर्लक्षित आहे .आणि जो स्वार्थी आहे तो अगदी तळहातावर आहे. त्याचा सगळीकडेच बोलबाला आहे . हे अगदी कटु सत्य आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक संबंधात नात्या मध्ये स्वार्थी आणि संधी साधु निषठवंताचा बोलबाला झाला आहे . त्यामुळे खरे प्रमाणिक आणि मी निस्वार्थी निष्ठावंत पायदळी तुडवले जातात. मग हे नेमकं दुर्भाग्य कोणाच . ज्याला सत्य असत्य खरा खोटा स्वार्थी निस्वार्थी लक्षात येत नाही त्याच कि ज्याच्या संदर्भात हे सगळं घडलं आहे त्याचं. शेवटी महत्वाचं हेच आहे कि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या घटना घडामोडी व सार्वजनिक जीवनातील सुद्धा वेगवेगळ्या बाबी या अनुषंगाने कित्येक लोक हे आपल्या जीवनातील सगळ्यात जवळचे आणि प्रमाणिक हित चिंतक आहेत.आपले हितेषी आहेत असं भासवतात पण या पाठिमागे स्वार्थ आहे. कि निस्वार्थी आहे. हे आपल्याला न समजणं म्हणजे आपलं भविष्यात खुप मोठा नुकसान करून घेणं आहे. म्हणून नातं असो किवा सार्वजनिक जीवन किंवा व्यवहार व्यापार समाजकारण राजकारण कोणत्याही क्षेत्रातील आपला निष्ठावंत समर्थक शोधता येण आवश्यक आहे .आणि त्यासाठी आवश्यक अशी दिव्य दृष्टी लाभण्यासाठी ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे.आणि आपलं भविष्यात होणार अहित टाळण्याचा अ प्रतिम मार्ग म्हणजे खरा निष्ठावंत भेटणं आणि ओळखण .
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301