
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
आज दिनांक १३ आॅगस्ट रोजी
लोहा व पालम तालुक्याच्या सिमेवर गोदावरी नदी काठावर असलेल्या भोगाव ता. पालम येथे हनुमंतरामाच्या रोटाचा व प्रसिध्द किर्तनकार श्री ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भोगाव येथील हनुमंतराय ( मारोती) हे प्रसिद्ध देवस्थान असुन येथे लोहा ,पालम, कंधार, नांदेड,परभणी आदी भागांतून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी व रोटाचा कार्यक्रमासाठी येतात त्यांचाच एक भाग म्हणून लोहा तालुक्यातील कृषी बि-बियाण्यांचे , रासायनिक खतांचे,औषधी,व्यापारी श्रीहरी कृषी सेवा केंद्राचे संचालक तथा बोरगाव आ. येथील पॅंनल प्रमुख पुंडलिकराव पाटील बोरगावकर परिवाराच्या वतीने आज दिनांक १३ रोजी वार शनिवार भोगाव येथील हनुमंताचा रोट व प्रसिध्द किर्तनकार श्री ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ११ ते १ या वेळात होणार आहे तर त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी १ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक पुंडलिकराव पाटील बोरगावकर, विठ्ठल पाटील बोरगावकर, माधव पाटील बोरगावकर, प्रदिप पाटील बोरगावकर, अजित पाटील बोरगावकर यांनी केले आहे.